Panchmukhi Hanuman Kavach PDF in Marathi | पंचमुखी हनुमान कवच मराठी, PDF, Lyrics, Free Download

Panchmukhi Hanuman Kavach PDF in Marathi – हनुमान भक्तांना शतशः नमस्कार, आमच्या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे, या लेखात आम्ही तुम्हाला पंचमुखी हनुमान कवच, त्याचे फायदे, पठण करण्याची पद्धत, तसेच हा पंचमुखी हनुमान कवच मजकूर डाउनलोड आणि लोड कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती देत ​​आहोत. पीडीएफ लिंक देखील देत आहोत ज्यासाठी तुम्ही सहज डाउनलोड करू शकाल,

पंचमुखी हनुमान कवच बद्दल वेद पुराणात कुठे कुठे सांगितले आहे की पंचमुखी हनुमान कवच नित्य पठण करावे, स्नान करून या कवचचे संपूर्ण विधीपूर्वक पठण केल्याने बरेच फायदे होतात, भक्तांना या पाठाचा विशेष लाभ घ्यायचा असेल तर. , नंतर श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व नियम व नियमांनी करावे.

पुराणात हनुमानजींना लवकर प्रसन्न करण्यासाठी हनुमानाने कवच मंत्र सांगितला आहे, या मंत्रात अफाट सामर्थ्य आहे, असे मानले जाते की हा मंत्र स्वतः श्री रामांनी रचला होता, जेव्हा प्रभू राम भगवान श्री राम यांनी हनुमान कवचचा पाठ केला तेव्हा ते युद्ध करत होते. रावणासह, आणि सीता मातेने देखील तिच्याभोवती संरक्षण कवच बनवण्यासाठी हनुमान कवच पठण केले.

श्री हनुमान कवच हे स्वतःमध्ये एक शक्तीचे रूप आहे, या मंत्राच्या प्रभावाने दुष्टांवर विजय होतो, त्याच बरोबर सर्वात मोठी नकारात्मक शक्ती देखील यापासून दूर राहते, या पंचमुखी हनुमान कवचचे पठण अत्यंत भयंकर परिस्थितीतून होण्यास मदत करते. बाहेर पडा, कवच पाठ केल्यानंतर, तुम्ही हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि हनुमान जीची आरती देखील पाठ करू शकता.

Name. Panchmukhi Hanuman Kavach) PDF in english
PDF Page4
PDF Size0.66 MB
LanguageMarathi
CategoryReligion& spirituality
Upload ByMohit Singh
Panchmukhi Hanuman Kavach PDF in Marathi | पंचमुखी हनुमान कवच मराठी, PDF, Lyrics, Free Download
Panchmukhi Hanuman Kavach PDF in Marathi | पंचमुखी हनुमान कवच मराठी, PDF, Lyrics, Free Download

All Language Panchmukhi Hanuman Kavach PDF | पंचमुखी हनुमान कवच PDF Free Download

Panchmukhi Hanuman Kavach PDF in Marathi Lyrics

॥ हरि: ॐ ॥

॥ श्री पंचमुख-हनुमत्-कवच ॥

(संस्कृत आणि मराठीत अर्थ)

॥ अथ श्रीपञ्चमुखहनुमत्कवचम् ॥

 श्रीगणेशाय नम:|
ॐ अस्य श्रीपञ्चमुखहनुमत्कवचमन्त्रस्य ब्रह्मा ऋषि:|
गायत्री छंद:| पञ्चमुख-विराट् हनुमान् देवता|
ह्रीम् बीजम्| श्रीम् शक्ति:| क्रौम् कीलकम्|
क्रूम् कवचम्| क्रैम् अस्त्राय फट् | इति दिग्बन्ध:|

या स्तोत्राचा ऋषि ब्रह्मा असून छंद गायत्री, ह्या स्तोत्राची देवता पंचमुख-विराट-हनुमान आहे, ह्रीम् बीज आहे, श्रीम् शक्ति आहे, क्रौम् कीलक आहे, क्रूम् कवच आहे आणि ‘क्रैम् अस्त्राय फट्’ हा दिग्बन्ध आहे.
 
॥ श्री गरुड उवाच ॥

अथ ध्यानं प्रवक्ष्यामि शृणु सर्वांगसुंदर |
यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमत: प्रियम् ॥१॥

गरुड म्हणाला – हे सर्वांगसुंदर, देवांचाही देव असणार्‍या देवाधिदेवाने हनुमंताचे, त्याला प्रिय असणारे जे ध्यान केले ते मी तुला आता सांगतो.
 
 पञ्चवक्त्रं महाभीमं त्रिपञ्चनयनैर्युतम् |
बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदम् ॥२॥

पाच मुखे असलेला, प्रचंड विशालकाय असा, तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा नयन (त्रिपञ्चनयन) असणारा असा हा पंचमुख-हनुमन्त आहे.
दहा हातांनी युक्त असा, सकल काम आणि अर्थ हे पुरुषार्थ सिद्ध करून देणारा असा तो आहे.

 पूर्वं तु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् |
दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटिकुटिलेक्षणम्॥३॥

ह्याचं पूर्वदिशेचं जे मुख आहे किंवा पूर्वदिशेला बघणारे जे मुख आहे, ते वानरमुख आहे, ज्याची प्रभा (तेज) कोटिसूर्यांइतकी आहे.

त्याचं हे मुख कराल (कराल = भयकारक) दाढा (दंष्ट्रा) असणारे असे मुख आहे. भ्रुकुटि म्हणजे भुवई आणि कुटिल म्हणजे वाकडी. भुवई वाकडी करून बघणारे असे हे मुख आहे.

अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम् |
अत्युग्रतेजोवपुषं भीषणं भयनाशनम् ॥४॥

वक्त्र म्हणजे चेहरा, मुख, वदन. ह्याचं दक्षिणदिशेचे किंवा दक्षिण दिशेस पाहणारे जे मुख आहे, ते नारसिंहमुख आहे आणि ते अत्यंत अद्भुत असे आहे. 
अत्यंत उग्र असं तेज असलेले वपु (वपु = शरीर) ज्याचं आहे असा हनुमंत (अत्युग्रतेजोवपुषं), त्याचे हे मुख भय उत्पन्न करणारे (भीषणं) आणि भय नष्ट करणारे असे मुख आहे. (हनुमंताचे मुख एकाच वेळी वाईट माणसांसाठी भीषण आणि भक्तांसाठी भयनाशक आहे.)
 
 पश्‍चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम् |
सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम्॥५॥

पश्‍चिम दिशेचे किंवा पश्‍चिमेला बघणारे जे मुख आहे ते गरुडमुख आहे. ते गरुडमुख वक्रतुण्ड आहे. त्याचप्रमाणे ते मुख महाबल आहे, अत्यंत सामर्थ्यवान आहे. 
सर्व नागांचे प्रशमन करणारे, विष आणि भूत इत्यादिकांचे (विषबाधा, भूतबाधा आदि बाधांचे) कृंतन करणारे (पूर्णपणे नायनाट करणारे) असे हे (पंचमुखहनुमंताचे) गरुडानन आहे.
 
उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दीप्तं नभोपमम् |
पातालसिंहवेतालज्वररोगादिकृन्तनम् ॥६॥

उत्तर दिशेचे किंवा उत्तरेस पाहणारे मुख हे वराहमुख आहे. ते कृष्ण वर्णाचे (काळ्या रंगाचे) आहे, तेजस्वी आहे, ज्याची उपमा आकाशाची करता येईल असे आहे.
पातालात राहणार्‍यांचा प्रमुख वेताळ आणि भूलोकी त्रास देणार्‍या व्याधिंचा प्रमुख ज्वर ह्यांचे कृंतन करणारे, त्यांना समूळ नष्ट करणारे असे हे उत्तर दिशेचे वराहमुख आहे.

ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम् |
येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यं महासुरम् ॥७॥

जघान शरणं तत्स्यात्सर्वशत्रुहरं परम् |
ध्यात्वा पञ्चमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम् ॥८॥

ऊर्ध्व दिशेला जे आहे किंवा ऊर्ध्व दिशेला बघणारे जे आहे, ते अश्‍वमुख आहे. हय म्हणजे घोडा = अश्‍व. हे दानवांचा नाश करणारे असे श्रेष्ठ मुख आहे.
हे विप्रेन्द्रा (श्रेष्ठ गायत्री उपासका), तारकाख्य नामक प्रचंड असुराला ज्याने नष्ट केले असे हे अश्‍वमुख आहे. सर्व शत्रुंचे हरण करणार्‍या अशा श्रेष्ठ पंचमुख-हनुमंताच्या चरणी तू शरण रहा.
रुद्र आणि दयानिधी अशा दोन्ही रूपांत असणार्‍या हनुमंताचे ध्यान करावे व (आता तो पंचमुख-हनुमंताच्या दहा आयुधांबद्दल सांगत आहे.)

 खड़्गं त्रिशूलं खट्वाङ्गं पाशमङ्कुशपर्वतम् |
मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुम् ॥९॥

भिन्दिपालं ज्ञानमुद्रां दशभिर्मुनिपुंगवम् |
एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम् ॥१०॥

(पंचमुख-हनुमंताच्या हातांमध्ये) तलवार, त्रिशूल, खट्वाङ्ग नावाचे आयुध, पाश, अंकुश, पर्वत आहे. 
त्याचप्रमाणे मुष्टि नावाचे आयुध, कौमोदकी गदा. पंचमुख-हनुमंताने एका हाताने वृक्ष धारण केला आहे तसेच त्याच्या एका हातात कमंडलु आहे.    
पंचमुख-हनुमंताने भिंदिपाल धारण केले आहे. भिंदिपाल हे लोहाने बनलेले विलक्षण अस्त्र आहे. हे फेकून मारले जाते, तसेच यातून बाणही मारता येतात. पंचमुख-हनुमंताचे दहावे आयुध आहे ’ज्ञानमुद्रा’. अशी दहा आयुधे आणि ह्या आयुधांची जाळी त्याने धारण केली आहेत. अशा ह्या मुनिपुंगव (मुनिश्रेष्ठ) पंचमुख-हनुमंताची मी (गरुड) स्वतः भक्ती करतो.

 प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरणभूषितम् |
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ॥११॥

हा प्रेतासनावर बसलेला (प्रेतासनोपविष्ट) (उपविष्ट म्हणजे बसलेला) आहे, हा सर्व-आभरणांनी भूषित (आभरण म्हणजे अलंकार, दागिने) सर्व अलंकारानी शोभून दिसणारा असा (सर्व अलंकार = सकल ऐश्‍वर्यांनी विभूषित असा) आहे.
दिव्य माला आणि दिव्य वस्त्र (अंबर) त्याने धारण केले आहे. तसेच दिव्यगंधाचा लेप त्याने अंगाला लावलेला आहे.
 
सर्वाश्‍चर्यमयं देवं हनुमद्विश्‍वतो मुखम् ॥
पञ्चास्यमच्युतमनेकविचित्रवर्णवक्त्रं
शशाङ्कशिखरं कपिराजवर्यम् |
पीताम्बरादिमुकुटैरुपशोभिताङ्गं
पिङ्गाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि ॥१२॥

सकल आश्‍चर्यांनी भरलेला, आश्‍चर्यमय असा तो आमचा देव आहे. विश्‍वात सर्वत्र ज्याने मुख केले आहे असा हा पंचमुख-हनुमंत आहे. असा हा पाच मुखे असणारा (पञ्चास्य), अच्युत आणि अनेक अद्भुत वर्णयुक्त (रंगयुक्त) मुखे असणारा आहे.
शश म्हणजे ससा. शश ज्याच्या अंकावर आहे असा चंद्र म्हणजे शशांक. अशा शशांकास म्हणजे चन्द्रास ज्याने माथ्यावर (शिखर) धारण केले आहे असा तो (शशांकशिखर) हनुमंत आहे. कपिंमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा असा हा हनुमंत आहे. पीतांबर आदि, मुकुट अशा गोष्टींनी सुशोभित ज्याचे अंग आहे असा हा आहे. 
पिङ्गाक्षं, आद्यम् आणि अनिशं असे तीन शब्द येथे आहेत. गुलाबी आभायुक्त पीत वर्णाचे अक्ष (इंद्रिये/डोळे) असलेला असा हा आहे. हा आद्य म्हणजे पहिला आहे. हा अनिश आहे म्हणजे निरंतर आहे म्हणजे शाश्‍वत आहे. अशा या पंचमुख-हनुमंताचे आम्ही मनःपूर्वक स्मरण करतो.
    
 मर्कटेशं महोत्साहं सर्वशत्रुहरं परम् |
शत्रुं संहर मां रक्ष श्रीमन्नापदमुद्धर ॥

वानरश्रेष्ठ असा हा प्रचंड उत्साही हनुमंत सर्व शत्रुंचा नि:पात करणारा आहे. हे श्रीमन् पंचमुख-हनुमंता, माझ्या शत्रुंचा संहार कर. माझं रक्षण कर. संकटामधून माझा उध्दार कर.

 ॐ हरिमर्कट मर्कट मन्त्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले |
यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुञ्चति मुञ्चति वामलता ॥
ॐ हरिमर्कटाय स्वाहा |

महाप्राण हनुमंताच्या डाव्या पायाच्या तळव्याखाली ‘ॐ हरिमर्कटाय स्वाहा’ हे जो लिहील, त्याच्या फक्त शत्रुचाच नाही तर शत्रुकुळाचा नाश होईल. वाम शब्द येथे वाममार्गाचे म्हणजेच कुमार्गाचे प्रतिनिधित्व करतो. वाममार्गावर जाण्याची वृत्ती, ओढ म्हणजे वामलता. (जसे कोमल-कोमलता तसे वामल-वामलता.) या वामलतेला म्हणजे दुरिततेला, तिमिरवृत्तीला हनुमंत समूळ नष्ट करून टाकतो. 
आता प्रत्येक वदनाला स्वाहा म्हणून नमस्कार केला आहे.
 
 ॐ नमो भगवते पञ्चवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा |
सकल शत्रुंचा संहार करणार्‍या पूर्वमुखास, कपिमुखास, भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो.
 
ॐ नमो भगवते पञ्चवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाहा |
दुष्प्रवृत्तींसाठी भयंकर मुख असणार्‍या (करालवदनाय), सर्व भूतांचा उच्छेद करणार्‍या, दक्षिणमुखास, नरसिंहमुखास भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो.

 ॐ नमो भगवते पञ्चवदनाय पश्चिममुखाय गरुडाननाय सकलविषहराय स्वाहा |
सकल विषांचे हरण करणार्‍या पश्‍चिममुखास, गरुडमुखास, भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो.

 ॐ नमो भगवते पञ्चवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा |
सकल संपदा देणार्‍या उत्तरमुखास, आदिवराहमुखास, भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो. 

 ॐ नमो भगवते पञ्चवदनाय ऊर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा |
सकल जनांना वश करणार्‍या,  ऊर्ध्वमुखास, अश्‍वमुखास भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो. 

 ॐ श्रीपञ्चमुखहनुमन्ताय आञ्जनेयाय नमो नम: ॥
आञ्जनेय श्री पञ्चमुख-हनुमन्तास पुन: पुन: नमस्कार असो.
 ॥ हरि ॐ ॥
Panchmukhi Hanuman Kavach PDF in Marathi Download
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment

error: Content is protected !!